Sangli Burglary : सांगलीत फ्लॅटचे कुलूप तोडून आठ तोळे दागिने लांबवले

संजयनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Burglary
Burglary
Published on
Updated on

​सांगली : येथील पंचशील नगरमधील 'दिशा अपार्टमेंट'मध्ये बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे आठ तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. सध्याच्या बाजारभावाने या दागिन्यांची किंमत सुमारे १२ लाख रुपये होत असली तरी, पोलिस ठाण्यात त्यांची नोंद २ लाख ४ हजार रुपये दाखवण्यात आली आहे.

अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. टी-०२ मध्ये राहणाऱ्या निवृत्त ग्रंथपाल भारती मल्लेशकुमार कडाके (वय ४८) या १० ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० ते ३ या कालावधीत घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्याने फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने लांबवले.

यामध्ये ३ तोळे वजनाचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचा नेकलेस, १४ ग्रॅम वजनाची दोन मंगळसूत्रे, अर्धा तोळा वजनाची मोहनमाळ, अर्धा तोळा वजनाची साखळी, सोन्याच्या रिंगा, टॉप्स, १ तोळा साडेतीन ग्रॅमची अंगठी, सोन्याची नाणी, बाळी आणि १० तोळे वजनाचे चांदीचे वाळे व तोडे असा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी भारती कडाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजयनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news