Ratnagiri News : एलईडी मासेमारीविरोधात ‌‘ऑपरेशन क्लीन-सी‌’

चार दिवसांत तीन नौका पकडल्या; मत्स्य संपत्तीची लूट करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले
LED fishing ban
एलईडी मासेमारीविरोधात ‌‘ऑपरेशन क्लीन-सी‌’
Published on
Updated on

रत्नागिरी : अनधिकृत मासेमारीविरोधात मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्य व्यवसाय विभागाने ‌‘ऑपरेशन क्लीन-सी‌’ अंतर्गत मोठी मोहीम उघडली आहे.

जयगडपासून दाभोळपर्यंतच्या विस्तीर्ण समुद्रकिनारी भागात विभागाने सर्च मोड ऑन करत गेल्या काही दिवसांत सलग कारवाया करत अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांवर सर्जिकल स्ट्राईक केला असून, मागील चार दिवसांत तीन नौका पकडल्या आहेत. जयगड बंदर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. 3 एप्रिल रोजी पहाटे मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान गस्त घालत असताना ‌‘भराडी प्रसन्न‌’ ही नौका साधनांसह रंगेहाथ जप्त करण्यात आली. त्यानंतर 7 एप्रिल रोजी रात्री ‌‘सफा मरवा-1‌’ ही नौका अवैध मासेमारी करताना सापडली. ही नौका सध्या दाभोळ बंदरात जप्त करून ठेवण्यात आली आहे. या यशस्वी मोहिमेत सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी दीप्ती साळवी (दाभोळ) आणि स्वप्निल चव्हाण (गुहागर) यांनी नेतृत्व केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news