Sangli News : अग्निशमनमध्ये ५० कर्मचारी खासगी एजन्सीकडून घेणार

एक वर्षासाठी होणार नियुक्ती; उद्या स्थायी समितीच्या सभेत होणार निर्णय
Sangli Municipal Corporation
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकाPudhari
Published on
Updated on

सांगली : महापालिकेच्या अग्निशमन विभागात ५० कर्मचारी खासगी एजन्सीकडून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये ४० फायरमन व १० चालकांचा समावेश आहे. त्यासाठी आदमस एंटरप्रायझेस कंपनीची वार्षिक १ कोटी ५६ लाख ७८ हजाराची निविदा अंतिम मान्यतेसाठी स्थायी समितीच्या सभेत आली आहे. यावरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. याबाबतचा निर्णय होणाऱ्या महापालिकेच्या स्थायी समितीच्‍या सभेत होणार आहे. ही सभा सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी होणार आहे.

एक वर्षासाठी या कर्मचार्‍यांची नेमणूक असणार आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागावर शहरातील तसेच उपनगरांतील आगीच्या घटना, अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करण्याची जबाबदारी आहे. मात्र, विभागात आवश्यक त्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे तातडीची गरज लक्षात घेऊन खासगी एजन्सीमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार ४० फायरमन आणि १० चालक अशा एकूण ५० कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये चालक आणि यंत्रचालकांच्या १० जागा भरण्यात येणार आहेत. त्यांना किमान वेतन १४ हजार, तर विशेष भत्ता ९ हजार १०० असे एकूण २३ हजार १०० मासिक वेतन देण्यात येणार आहे.

तसेच फायरमनच्या ४० जागा असून त्यांना देखील मासिक वेतन २३ हजार १०० देण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ३८ लाख ६० हजार रुपये वेतन होणार आहे. यामध्ये मनपाला ईपीएफ १२ टक्के हा मनपाचा १६ लाख ६३ हजार २०० रुपये, त्यामध्ये १ टक्का सेवाकर १ लाख ५५ हजार २३२ असा हिस्सा घालावा लागणार आहे. त्यामुळे मनपाच्या तिजोरीवर वार्षिक १ कोटी ५६ लाख ७८ हजार ४३२ रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. आदमस एंटरप्रायझेस कंपनीची वार्षिक १ कोटी ५६ लाख ७८ हजार रुपयांची निविदा निश्चित करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news