Sangli News| करोली टी येथे आगीत दीड एकर ऊस जळाला

केदारलिंग वस्ती परिसरातील घटना
Sangli News
करोली टी येथे आगीत दीड एकर ऊस जळालाPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

कवठेमहांकाळ : महावितरणच्या विद्युत वाहिन्यांमधून अचानक ठिणग्या उडाल्याने करोली टी (ता. कवठेमहांकाळ) येथील केदारलिंग वस्ती परिसरातील शेतात भीषण आग लागली. या आगीत सुमारे दीड एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. ऊस पिकासह सुमारे ४०० फूट ठिबक सिंचनाची पाइपलाइन आणि बोअरवेलचे ३०० फूट वायरिंग जळाले. यामुळे शेतकरी आनंदा किसन पाटोळे व तानाजी किसन पाटोळे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करोली टी येथील गट क्रमांक ६१९ मध्ये पाटोळे बंधूंची शेती असून, हे शेत केदारलिंग वस्ती व वनविभागाच्या परिसरालगत आहे. शेतातून गेलेल्या महावितरणच्या मुख्य विद्युत वाहिन्यांमध्ये अचानक बिघाड होऊन त्यातून पडलेल्या ठिणगीमुळे ऊसाला आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे दीड एकर क्षेत्रातील उभा ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. आगीची झळ सिंचन व्यवस्थेला बसून सुमारे ४०० फूट ठिबक पाइपलाइन आणि बोअरवेलची ३०० फूट विद्युत वायरिंग जळाले.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा. परिसरातील सर्व धोकादायक व लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news