Sangli : वृद्ध महिलेची फसवणूक करणारा तोतया पोलिस जेरबंद

सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित ठाणे जिल्ह्यातील
fake police
तोतया पोलिसFile Photo
Published on
Updated on

सांगली ः पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेच्या चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन पसार झालेल्या तोतयाला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. जहीर अब्बास सलीम काझी (वय 40, रा. दर्ग्याजवळ, बनेली, टिटवाळा, जि. ठाणे) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याच्या बांगड्या व दुचाकी, असा 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी रुकैया इब्राहिम साबळे (वय 71, रा. रोझी प्लाझा, मु. पो. काविळतळी, चिपळूण, जि. रत्नागिरी) या दि. 23 जूनरोजी मिरजेत शिवाजी रोडवरून चालत जात होत्या. त्यावेळी संशयित काझी व त्याचा साथीदार दुचाकीवरून आले. त्यांनी साबळे यांना, ‘पुढे अपघात झाला असून तपासणी सुरू आहे. तिथे आमचे साहेब आहेत. ते तुम्हाला विचारतील. तुमच्या बांगड्या काढून ठेवा’, असे म्हणून हातचलाखीने त्यांच्या बांगड्या काढून घेऊन धातूची गोल वस्तू कागदात गुंडाळून त्यांना दिली व ते पसार झाले. काही वेळानंतर साबळे यांनी बांगड्या तपासल्या असता, त्या बनावट धातूच्या असल्याचे दिसून आले. त्यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला दिले होते. संशयितांच्या शोधासाठी पथकाने मुंबई, बिदर (कर्नाटक), श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथे तपास केला. पथकातील अंमलदार सागर लवटे व अनिल कोळेकर यांना हा गुन्हा जहीर काझी याने केला असून तो माधवनगर येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने माधवनगर जकात नाक्याजवळ काझी याला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news