Sangli Accident : मोटरसायकलच्या धडकेत 80 वर्षीय वृद्धा ठार

बिऊर येथील मोरणा पुलाजवळील घटना; चालक अपघातानंतर पसार
Sangli Accident News
मोटरसायकलच्या धडकेत 80 वर्षीय वृद्धा ठार
Published on
Updated on

शिराळा : शिराळा-कोकरूड रस्त्यावर बिऊर गावच्या मोरणा नदीच्या पुलाजवळ अज्ञात मोटरसायकलच्या धडकेत 80 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 13 एप्रिल) सायंकाळी घडली. किसाबाई बाळकू पाटील (वय 80, रा. बिऊर) असे मृत वृद्धेचे नाव असून, अपघातानंतर चालक मोटरसायकलसह घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास किसाबाई पाटील या मोरणा नदीचा पूल ओलांडून कोकरूडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत जात होत्या. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी संबंधित चालकाने कोणतीही माहिती न देता मोटरसायकलसह घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या किसाबाई पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मृत महिलेचे नातू राजेंद्र विष्णू पाटील (वय 35, रा. नाथ फाटा, शिराळा) यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शशिकांत पाटील करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news