Sangli Crime : शेळी हाकलल्याच्‍या कारणावरून वृद्धेवर दगड-विटांनी हल्ला

धुळगावातील प्रकार; एकावर गुन्हा
crime
crime
Published on: 
Updated on: 

तासगाव : धुळगाव (ता. तासगाव) येथे शेळी हाकलल्याच्‍या कारणावरून ६५ वर्षीय महिलेवर दगड आणि विटेच्या तुकड्याने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास धुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. याप्रकरणी शोभा भीमराव सौंदडे (वय ६५, रा. धुळगाव, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली असून, अर्जुन मारुती सौंदडे (रा. धुळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी शोभा यांच्या शेळ्या संशयित अर्जुन याच्या घरासमोर गेल्या होत्या. त्या शेळ्या हाकलण्यासाठी शोभा अर्जुन याच्या दारात गेल्या होत्या. या कारणाचा राग मनात धरून अर्जुन याने त्या शाळेजवळून जात असताना त्यांच्यावर दगडफेक केली. त्यानंतर अर्जुनने शिवीगाळ व दमदाटी करत शोभा यांना खाली पाडले आणि हातातील विटेच्या तुकड्याने उजव्या डोळ्यावर व खांद्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news