Sangli Accident : मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू

गोटखिंडी फाट्याजवळ अपघात; एकाची प्रकृती गंभीर
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

आष्टा : ईश्वरपूर-आष्टा मार्गावर गोटखिंडी फाट्याजवळ सोमवारी, दि. २६) दुपारी मोटारीने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव बापुसाहेब शिंदे (वय ६५, रा. पुनवत, ता. शिराळा) असे मृताचे नाव आहे, तर दुचाकीचालक रणजित भानुदास शेनवी (रा. मांगरूळ, ता. शिराळा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव शिंदे हे रणजित शेनवी यांच्यासोबत दुचाकीवरून (क्र. एमएच ११ एएम ४१७१) ईश्वरपूरहून आष्ट्याच्या दिशेने जात होते. गोटखिंडी फाट्याजवळ दिनकर पाटील यांच्या शेताजवळ ते आले असता, सुदाम राजाराम अनुसे (रा. बावची) याच्या ताब्यातील मोटारीने (क्र. एमएच १० ईआर ६२११) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेले नामदेव शिंदे गंभीर जखमी झाले. वर्मी मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर रणजित शेनवी गंभीर जखमी झाले. याप्रकरणी धीरज नामदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटार चालक सुदाम अनुसे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. आष्टा पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news