

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथे महिलेच्या गरोदरपणातील उपचारात हलगर्जीपणा केल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी हुसेन ईस्माईल शेख यांनी विश्वास नर्सिंग होमच्या डॉ. प्रणिता पाटील-कदम आणि त्यांच्या नर्सिंग स्टाफविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 8 जानेवारी 2024 ते 6 नोव्हेंबर 2024 यादरम्यान घडली होती.
त्यांच्या फिर्यादीनुसार, हुसेन शेख यांची पत्नी अनारकली शेख या गरोदर होत्या. यादरम्यान डॉ. प्रणिता पाटील-कदम यांच्या विश्वास नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारात त्यांनी हलगर्जीपणा केल्याने अनारकली यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. याच कारणामुळे त्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार संजयनगर पोलिस ठाण्यात डॉ. प्रणिता पाटील-कदम यांच्यासह त्यांच्या स्टाफविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.