Sangli News : वाहन दुरुस्तीच्या वादातून डॉक्टरला बेदम मारहाण

दुधगाव येथील घटना : पोलिसांत चौघांवर गुन्हा
Crime News
वाहन दुरुस्तीच्या वादातून डॉक्टरला बेदम मारहाण
Published on
Updated on

सांगली : वाहन दुरुस्तीचे पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका डॉक्टरच्या डोक्यात खुर्ची घालून बेदम मारहाण करण्यात आली. तसेच रुग्णालयची तोडफोड करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. ही घटना सोमवारी रात्री १० च्या सुमारास मिरज तालुक्यातील दुधगाव येथे घडली. या मारहाणीत डॉ. इम्तियाज गौसमोहीद्दीन शिकलगार (वय ३८, रा. दुधगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. इम्तियाज शिकलगार यांचा दुधगाव येथे दवाखाना आहे. सोमवारी रात्री संशयित गणेश उल्हास माळी, प्रमोद मिणचेकर, किरण माळी आणि उल्हास माळी (सर्व रा. दुधगाव) हे चौघे त्यांच्या दवाखान्यात आले. त्यांनी वाहन दुरुस्तीच्या कारणावरून डॉ. शिकलगार यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद विकोपाला गेल्याने संशयितांनी दवाखान्यातील खुर्ची उचलून डॉ. शिकलगार यांच्या डोक्यात घातली. तसेच प्रमोद मिणचेकर याने बाहेर पडलेली लाकडी काठी आणून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत काठीचा फटका बसल्याने तेथे उपस्थित पिंकू कुदळे हा तरुणही चेहऱ्यावर मार लागून जखमी झाला. सर्व संशयितांनी डॉक्टरांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत दवाखान्यातील काचा आणि टेबलची तोडफोड केली. ‘तू बाहेर भेट, तुला बघून घेतो’, अशी धमकी देत संशयित पसार झाले. या प्रकरणी डॉक्टरांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news