Sangli News : सांगली जिल्ह्यात ३ लाख ८२ हजार मतदार वगळणार

सांगलीत ९० हजार तर जत मतदारसंघातील ३७ हजार नावे होणार कमी
Voting News
मतदान
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्यात आले. जिल्ह्यातील एकूण २५ लाख ७३ हजार ३३३ मतदारांपैकी २१ लाख ९ हजार ११२ (८५.१५ टक्के) मतदारांनीच प्रपत्र सादर केले आहे. आवश्यक प्रपत्र न भरल्याने किंवा अपात्र ठरल्याने ३ लाख ८२ हजार २१३ (१४.८५ टक्के) मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.

यामध्ये सर्वाधिक मतदार वगळले जाणाऱ्या मतदारसंघांमध्ये सांगली विधानसभा मतदारसंघाचा पहिला क्रमांक असून, येथे ९०,६८५ (२४.८२ टक्के) मतदारांची नावे वगळली जाणार आहेत. तर जत विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ३७,१५२ (१२.४८ टक्के) मतदार कमी होणार आहेत.

प्रपत्र न मिळालेल्या मतदारांचा समावेश 'अनकलेक्टेबल ईएफ' या गटात करण्यात आला आहे. यामध्ये मृत व्यक्ती, कायमस्वरूपी स्थलांतरित आणि दिलेल्या पत्त्यावर न आढळलेल्या मतदारांचा समावेश आहे. अशा मतदारांच्या तात्पुरत्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. या पुनरीक्षण प्रक्रियेची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, पुढे दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी महिन्याची मुदत देण्यात देण्यात येणार आहे.

असा आहे 'एसआयआर'चा पुढील कार्यक्रम

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : ३१ ऑगस्ट २०२६

दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर

नोटिसा व हरकतींचा निपटारा : ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६

अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ४ नोव्हेंबर २०२६

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news