Sangli DCC Bank recruitment: जिल्हा मध्यवर्ती बँकेत ४४४ लिपिकांची भरती

७० टक्के जागा स्थानिकांसाठी आरक्षित
Sangli DCC Bank
Sangli DCC BankPudhari
Published on
Updated on

​सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या ४४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया 'आयबीपीएस' या राष्ट्रीयीकृत व महाराष्ट्र शासनाच्या तालिकेवरील कंपनीमार्फत अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.

नाईक म्हणाले, या भरतीसाठी मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ८ जुलै रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असेल. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. थेट, पोस्ट किंवा कुरिअरद्वारे आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरतीची सविस्तर माहिती, आवश्यक पात्रता व तपशील मंगळवारपासून बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

बँकेच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार, एकूण जागांपैकी ७० टक्के जागा या सांगली जिल्ह्यातील तरुणांसाठी राखीव असतील. १८ ते ३५ वयोगटातील पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल. उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क १,००० रुपये अधिक जीएसटी असे निश्चित करण्यात आले आहे.

अर्जांची छाननी केल्यानंतर उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेतली जाईल. अर्जांची संख्या विचारात घेऊन सांगलीसह कोल्हापूर, पुणे आणि सातारा या प्रमुख केंद्रांवर ही ऑनलाईन परीक्षा पार पडेल. लेखी परीक्षेनंतर मुलाखत व कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम यादी जाहीर केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news