Sangli district bank: जिल्हा बँकेच्या सोन्याळ शाखेत अपहार; दोघांवर गुन्हा

सोन्याळ (ता. जत) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत शेतकरी अनुदानात निवृत्त शाखाधिकारी आणि लिपिकाने संगनमत करून साडेआठ लाखांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले
Sangli district bank
Sangli district bank: जिल्हा बँकेच्या सोन्याळ शाखेत अपहार; दोघांवर गुन्हाPudhari
Published on
Updated on

जत : सोन्याळ (ता. जत) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत शेतकरी अनुदानात निवृत्त शाखाधिकारी आणि लिपिकाने संगनमत करून साडेआठ लाखांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोघांवर उमदी पोलिस ठाण्यात एका वर्षानंतर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी जिल्हा बँकेच्या भरारी पथकातील चौकशी अधिकारी विक्रांत विजयकुमार लाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निवृत्त शाखाधिकारी राजेंद्र भीमराव कोळी (रा. जत) आणि लिपिक जितेंद्र महादेव अंकलगी (रा. जाडरबोबलाद) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वर्षभरापूर्वी हा प्रकार उघडकीस आला. संशयितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय दबावातून चालढकल सुरू होती. अखेर बँक प्रशासनाने निर्णयावर ठाम राहत, वर्षभराने का होईना, गुन्हा दाखल केला आहे.

संशयित राजेंद्र कोळी आणि जितेंद्र अंकलगी यांनी संगनमत करून शेतकरी शासकीय अनुदान खात्यामधून 2022/23 या वर्षात खोट्या सह्या करून तीन वेगवेगळ्या खात्यातून 99 हजार 936 रुपये, 10 हजार 591 रुपये व 7 लाख 36 हजार 435 रुपये, असा एकूण 8 लाख 46 हजार 962 रुपयांचा अपहार केला होता. तपासणीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत, लिपिक जितेंद्र अंकलगी यास निलंबित केले होते. मात्र गुन्हा दाखल करण्यास वेळ गेला, अखेर 25 फेब्रुवारीस पोलिसांत गुन्हा नोंद झाला. तपास उमदी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news