Sangli District Bank: आता होणार माजी न्यायाधीशामार्फत चौकशी

तिसरे अधिकारी : 82 कोटी रुपयांचा गैरव्यवहार
Sangli district bank
Sangli district bankPudhari
Published on
Updated on

सांगली : सांगली जिल्हा बँकेतील 81 कोटी 89 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची कलम 88 अंतर्गत चौकशी चालू आहे. याप्रकरणी मिरजेचे उपनिबंधक बिपिन मोहिते यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. आता शासनाने निवृत्त न्यायाधीश एम. आर. मखरे यांची नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे आदेश विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी काढले आहेत.

जिल्हा बँकेचे चौकशी अधिकारी मोहिते यांनी नियमित कामकाज, बैठका, न्यायालयीन काम त्यात निवडणूकविषयक कामकाज जास्त आहे. यामुळे चौकशी दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे शक्य नाही. तसेच बँकेच्या चौकशीसाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याने शासनाने सदरची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा अशी विनंती केली होती.

सुरुवातीला बँकेची चौकशी कोल्हापूरच्या उपनिबंधक डॉ. प्रिया दळणकर या करीत होत्या. त्यांनी कलम 71 (1) नुसार नोटिसा बजावून माहिती घेतली. नंतर कलम 72 (2) संबंधित संचालक, अधिकाऱ्यांना नोटीस बाजावून त्यांचे म्हणणे मागवले. या चौकशीला तत्कालीन सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. ती काही महिन्यांपूर्वी विद्यमान सहकारमंत्र्यांनी उठवली. त्याचवेळी चौकशी अधिकारी बदलत मिरजेचे उपनिबंधक बिपिन मोहिते यांची नियुक्ती केली. आता तिसरे चौकशी अधिकारी आहेत.

तत्कालीन चौकशी अधिकारी बिपिन मोहिते यांनी 50 कोटी 57 लाखप्रकरणी तत्कालीन संचालकांना नोटीस बजावली होती. त्यानंतर आ. सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीवरून चौकशीत आणखीन सहा मुद्दे समाविष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news