​Sangli District Bank Election | सांगली जिल्हा बँक निवडणूक; सहा जागांसाठी चिन्हांचे वाटप

प्रचाराचा धुरळा, मतदारांची पळवापळवी सुरू
Sangli District Bank Election
Sangli District Bankpudhari photo
Published on: 
Updated on: 

​सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून गुरुवार, दि. २२ रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. चिन्ह मिळताच सर्वच उमेदवारांनी प्रत्यक्ष प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले होते. मात्र, बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. पंधरा जागांवर प्रत्येकी एकच वैध अर्ज राहिल्याने त्या जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. आता उर्वरित ६ जागांसाठी १४ उमेदवार आमनेसामने आहेत. उर्वरित जागांपैकी तासगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज या विकास सेवा सोसायटी गटांमध्ये अत्यंत चुरशीची लढत रंगणार आहे. चिन्ह वाटप होताच उमेदवारांनी थेट प्रचाराला वेग दिला आहे.

दुसरीकडे, अत्यंत अटीतटीच्या ठरणाऱ्या या लढतीत एक-एक मत अत्यंत निर्णायक ठरणार असल्याने मतदारांना आपल्या बाजूने राखण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू झाली आहे. विरोधी गटाकडून होणारी मतदारांची पळवापळव रोखण्यासाठी काही उमेदवारांनी मतदारांना अगोदरच सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, तर काही ठिकाणी मतदारांना सहली व पर्यटनासाठी पाठवण्यात आल्याची चर्चा सहकार वर्तुळात रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news