Sangli News : जिल्हा बँकेच्या बांबवडे शाखेत शिपायाचा हृदयविकाराने मृत्यू

कामकाज सुरू असताना दुर्घटना
Sangli News
जिल्हा बँकेच्या बांबवडे शाखेत शिपायाचा हृदयविकाराने मृत्यू
Published on
Updated on

पलूस ः सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बांबवडे शाखेत रविवारी कामकाज सुरू असताना शिपाई संतोष वसंत पवार (वय 46, रा. सावर्डेकर कॉलनी, बांबवडे) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

मार्चएन्डमुळे रविवारी बँक सुरू होती. अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त होते. सायंकाळी 4:30 च्या सुमारास अधिकारी काम आटोपून घरी निघून गेले. त्यानंतर पवार हे बँकेची साफसफाई आणि झाडलोट करत होते. सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि मोठा घाम आला. त्यांनी अंगावरील कपडे बाजूला ठेवून पाणी पिले व आराम करण्यासाठी ते खुर्चीत बसले, मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

रात्री 9 वाजेच्या सुमारास शाळेच्या प्रांगणात फिरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना बँकेचे मुख्य प्रवेशद्वार उघडे असल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता संतोष पवार हे मृतावस्थेत आढळून आले. नागरिकांनी तातडीने बँक व्यवस्थापक आणि उपसरपंच पांडुरंग संकपाळ यांना या घटनेची माहिती दिली. पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ व भावजय असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news