Sangli Crime : 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून पाच लाखांचा गंडा

हिंगणगावच्या शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक
Digital arrest scam
Digital arrest scampudhari photo
Published on: 
Updated on: 

​कडेगाव शहर : मनी लाँड्रिंग आणि लहान मुलांच्या अवयव तस्करीत अडकवण्याची तसेच 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून ५८ वर्षीय शेतकऱ्याची ५ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात बनावट 'दिल्ली पोलिस' अधिकारी सुनिलकुमार गौतम आणि केरळ येथील बँक खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथील शेतकरी रमेश आनंदा जाधव (वय ५८) यांना एका भामट्याने मोबाईलवर संपर्क साधला. त्याने आपण 'दिल्ली पोलिस' दलातील अधिकारी सुनिलकुमार गौतम बोलत असल्याचे जाधव यांना सांगितले. ‘तुमच्या नावाने दिल्लीतील आयसीआयसीआय बँकेत एक अनधिकृत खाते उघडण्यात आले असून, त्याद्वारे मनी लाँड्रिंग आणि लहान मुलांच्या अवयव तस्करीत तब्बल २ लाख रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत’, असे सांगत जाधव यांना अटकेच्या कारवाईची धमकी दिली. अटकेच्या भीतीपोटी रमेश जाधव यांनी केरळ राज्यातील नीलेश्वर शाखेच्या 'व्हिजन व्हॉयेज स्ट्रॅटेजी' या नावावर असलेल्या फेडरल बँकेच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने ५ लाख रुपये वर्ग केले. काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी तातडीने कडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली. कडेगाव पोलिसांनी संशयित सुनिलकुमार गौतम आणि केरळ येथील फेडरल बँक खातेधारक 'व्हिजन व्हॉयेज स्ट्रॅटेजी' यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news