Sangli Crime : ढालगावात जमीन खरेदीच्या नावाखाली वृध्दाची फसवणूक

चोरोचीतील एकावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

नागज : जमीन खरेदीचा व्यवहार ठरवून दस्तासाठी घेतलेली २ लाख ४० हजार रुपयांची रक्कम परत न करता जमीन देण्यास नकार दिल्याप्रकरणी दीपक काका वाघमारे (रा. चोरोची, ता. कवठेमहांकाळ) यांच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ईश्वर तुकाराम पाटील (वय ६७, रा. ढालगाव, ता. कवठेमहांकाळ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक वाघमारे यांच्या वडिलांच्या मालकीची गट क्रमांक ८७४ मधील ३८ गुंठे जमीन खरेदी करण्याबाबत ईश्वर पाटील आणि दीपक वाघमारे यांच्यात व्यवहार ठरला होता. जमीन खरेदी दस्ताचा खर्च निम्मा-निम्मा करण्याचे दोन्ही बाजूंनी ठरले होते.

या व्यवहारादरम्यान ईश्वर पाटील यांनी टप्प्याटप्प्याने दीपक वाघमारे यांना एकूण २ लाख ४० हजार रुपये दिले. यामध्ये रोख रक्कम देताना फोटोही काढण्यात आला होता. तसेच १ ऑगस्ट २०२५ रोजी चोरोची गावातील देवळासमोर १० हजार रुपये, तर ढालगाव चौक व ढालगाव सोसायटी येथे उर्वरित रक्कम दिल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे.

मात्र, संपूर्ण रक्कम घेतल्यानंतर दीपक वाघमारे यांनी दस्ताचा खर्च परवडत नसल्याचे सांगत जमीन देण्यास थेट नकार दिला. शिवाय घेतलेली रक्कमही परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news