Devendra Fadnavis | महायुतीच्या डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा

पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी देवेंद्र फडणवीस साधणार थेट संवाद
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Pudhari
Published on: 
Updated on: 

सांगली : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ आज, सोमवार, १९ ऑक्टोबररोजी दुपारी बारा वाजता सांगलीत धामणी रोडवरील खरे क्लब हाऊस येथे पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा आयोजिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे आदी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यापूर्वी सांगलीतील सह्याद्रीनगर येथे भाजपचे प्रदेश सचिव शरद लाड यांच्या निवासस्थानी कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यालाही मुख्यमंत्री फडणवीस व नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली.

पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे हे भाजप महायुतीचे उमेदवार आहेत. जिल्ह्यात महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला गती आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्ह्यातील भाजप महायुतीचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा आजचा प्रचार दौरा होत आहे. त्यामुळे भाजप व घटकपक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सोमवारी दुपारी बारा वाजता खरे क्लब हाऊस येथे पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. सत्यजित देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुहास बाबर, आ. सदाभाऊ खोत, आ. इद्रिस नायकवडी, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेशसचिव शरद लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व महायुतीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news