Sangli News : देशमुखवाडीत गौण खनिज उत्खननावर कारवाई

महसूल पथकाचा पहाटे छापा; ट्रॅक्टर जप्त
Minor Minerals
अवैध गौण खनिज File Photo
Published on
Updated on

आटपाडी : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या आदेशान्वये आणि प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने देशमुखवाडी येथे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात विशेष धडक कारवाई केली.

पहाटेच्या सुमारास केलेल्या या अचानक कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. आटपाडीच्या तहसीलदार शीतल बंडगर यांनी गौण खनिज पथकासह देशमुखवाडी परिसरात छापा टाकला. यावेळी अवैध गौण खनिज वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेला लाल ट्रॅक्टर पथकाच्या निदर्शनास आला. महसूल अधिकाऱ्यांनी तत्काळ ट्रॅक्टर ताब्यात घेत तो आटपाडी तहसील कार्यालयात जमा केला. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी विनायक बालटे, नितीन नाईक, नितीन सानप, प्रशांत जाधव, बालाजी कांबळे, गोरख जावीर आणि संजय माने यांनी सहभाग घेतला. जप्त ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या नियमानुसार कारवाई सुरू आहे.

पहाटेच्या वेळी अचानक छापा टाकून वाहन जप्त केल्याने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहतील, असे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news