Sangli Burglary: सांगलीत दिवसा फ्लॅट फोडला; सव्वालाखाचा मुद्देमाल लंपास

१०० फुटी रस्त्यावरील गजसाई अपार्टमेंटमध्ये भरदिवसा बंद घर फोडून चोरट्याने १ लाख ३२ हजार १६० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
Burglary
Burglary
Published on
Updated on

सांगली : शहरातील १०० फुटी रस्त्यावरील गजसाई अपार्टमेंटमध्ये भरदिवसा बंद घर फोडून चोरट्याने १ लाख ३२ हजार १६० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पूनम शैलेंद्र कांबळे (वय ४०, रा. गजसाई अपार्टमेंट, १०० फुटी रस्ता, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. पूनम कांबळे १३ ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास घराला कुलूप लावून कामावर गेल्या होत्या. दिवसभर घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

कपाटातील तिजोरीतून ६३ हजार ७७० रुपयांचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र, ११ हजार ६९० रुपयांच्या कानातील रिंग, २४ हजार ५०० रुपयांचे टॉप्स, २१ हजार रुपयांच्या तीन सोन्याच्या वेढण्या आणि ११ हजार २०० रुपयांचे चांदीचे बिस्कीट, पेंडंट व जोडवी असा एकूण १ लाख ३२ हजार १६० रुपयांचा ऐवज लांबवला. कामावरून परतल्यानंतर कपाटातील तिजोरी उघडलेली व साहित्य विस्कटलेले दिसल्याने कांबळे यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून ठसे गोळा केले असून, पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news