Sangli Crime: सांगलीत आक्षेपार्ह छायाचित्र काढून महिलेवर अत्याचार

अंघोळ करतानाचे छायाचित्र काढून ते सार्वजनिक करण्याची धमकी
assault case
assault casefile photo
Published on
Updated on

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथे अंघोळ करतानाचे छायाचित्र काढून ते सार्वजनिक करण्याची धमकी देत आणि लहान मुलांना जिवे मारण्याची भीती दाखवून एका विवाहितेवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पांडुरंग आडेकर (वय २४, रा. आर. के. नगर, बोरगाव, ता. चिकोडी) याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडित महिला ही सध्या माधवनगर (बुधवार पेठ, ता. मिरज) येथे माहेरी राहत असून तिचे सासर बोरगाव (ता. निपाणी) येथे आहे. संशयित पांडुरंग आडेकर याने पीडित महिला अंघोळ करत असताना तिच्या नकळत मोबाईलमध्ये छायाचित्र काढले होते. त्यानंतर हे छायाचित्र सर्वांना दाखवण्याची आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने १२ फेब्रुवारी २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत महिलेच्या माहेरी माधवनगर येथे आणि सासरी बोरगाव येथील घरात घुसून जबरदस्तीने वारंवार शारीरिक अत्याचार केला.

सततच्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news