Sangli Crime: तीन खुनांनी जिल्हा हादरला

सांगलीत एक, तर जत तालुक्यात खुनाच्या दोन घटना उघड
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

सांगली : खुनाच्या तीन घटनांनी सोमवारी जिल्हा हादरला. सांगलीत एक आणि जत तालुक्यात दोन खून झाले.

येथील जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळ सौरभ महादेव पवार (वय 22, रा. राजीवनगर, कुपवाड रस्ता, सांगली) या तरुणाचा दोघांनी पाठलाग करून निर्घृण खून केला. नशेखोरांचा अड्डा बनलेल्या या ठिकाणी हा प्रकार सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान, संशयित शाहीद समीर मुल्ला व आयान समीर भिस्ती (दोघे रा. राजीवनगर) या दोघांनी हा खून केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. खुनानंतर हत्यार घेऊन पळणाऱ्या शाहीद मुल्ला याला पोलिसांनी पकडले, तर आयान पसार झाला आहे.

तसेच जत शहराजवळ मल्लाळ रस्त्यावर बिळूर येथील श्रीधर निमगोंडा येलगोंड (वय 40, रा. बिळूर) या तरुणाचा खून करण्यात आला. शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे. शंभर एकर जमिनीच्या वादावर चर्चेसाठी ते जत येथे आले हेोते. चर्चेनंतर दुचाकीवरून गावी परतताना पाळत ठेवून त्यांचा खून करण्यात आला. येथीलच दुसऱ्या घटनेत जत शहरापासून चार किलोमीटरवरील अमृतवाडी हद्दीत एका शेतात अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला. अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या या महिलेचा खून करून, चेहऱ्यावर ॲसिड टाकून चेहरा विद्रुप केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news