Sangli Theft Case : पोलिसांच्या घरात चोरीप्रकरणी चोरट्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना

अकरा तोळे सोन्यासह पाच लाखांची रोकड लंपास
house burglary
पोलिसांच्या घरात चोरीप्रकरणी चोरट्यांच्या शोधासाठी तीन पथके रवानाpudhari file photo
Published on
Updated on

सांगली : संजयनगर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील एका अपार्टमेंटमधील पोलिसाच्या फ्लॅटसह तीन बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले होते. त्यातील पोलिसाच्या घरातून अकरा तोळे सोन्याचे दागिने आणि चार लाख 80 हजारांची रोकड चोरीस गेली आहे, तर अन्य दोन घरांतून पंधरा तोळे सोने लंपास केले. दरम्यान, संशयितांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या तीन पथकांसह संजयनगर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

संजयनगर पोलिस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या मयुरेश रेसिडेन्सीमध्ये पहिल्या मजल्यावर संजयनगर पोलिस ठाण्याचे अंमलदार कपिल साळुंखे यांचा फ्लॅट आहे. त्यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी सोन्याचे अकरा तोळे दागिने आणि 4.80 लाखांची रोकड लंपास केली, तर त्याच रेसिडेन्सीमधील आठव्या माळ्यावर नरेंद्र खोकडे यांच्या घरातून सात तोळे दागिने आणि दहा हजारांची रोकड लंपास केली.

यापूर्वी सह्याद्रीनगर येथील शिवबाळ दगडे अपार्टमेंटमध्ये महेश शिंदे यांच्या बंद फ्लॅटमधून चोरट्यांनी आठ तोळ्यांचे दागिने आणि पाच हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. एकापाठोपाठ झालेल्या चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलिसाचेच घर फोडल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. चोरी करणारे दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाले आहेत. त्याआधारे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news