Sangli Crime: शोभेच्या दारूची विनापरवाना निर्मिती; सातजणांवर गुन्हा

शोभेच्या दारू स्फोटप्रकरणी जखमी सात जणांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे
Sangli Crime |
Sangli Crime: शोभेच्या दारूची विनापरवाना निर्मिती; सातजणांवर गुन्हा File Photo
Published on
Updated on

तासगाव : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील रविवारी झालेल्या शोभेच्या दारू स्फोटप्रकरणी जखमी सात जणांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार श्रीकांत जयगोंडा अभंगे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यात जखमी आनंद नारायण यादव (वय 55 रा, कवठेएकंद), विवेक आनंदराव पाटील (38, रा. दत्तमाळ, तासगाव), गजानन शिवाजी यादव (29), अंकुश शामराव घोडके (21), प्रणव गोविंद आराध्ये (21), ओमकार रवींद्र सुतार (21) व सौरभ सुहास कुलकर्णी (27, सर्व रा. कवठेएकंद, ता. तासगाव) यांचा समावेश आहे.

दसर्‍यानिमित्त कवठेएकंद येथील ग्रामदैवत बिर्‍हाडसिद्ध देवाच्या पालखी सोहळ्यानिमित्त येथील समाज मंदिरामध्ये शोभेच्या दारूनिर्मितीचे काम करीत होते. त्यांनी कोणताही परवाना घेतला नव्हता. तसेच कोणतीही खबरदारी न घेता किंवा दारू बनविण्याचे प्रशिक्षण न घेता ज्वालाग्राही पदार्थांबाबत हयगयीने कृत्य केले.

स्वतःच्या व इतरांची सुरक्षितता धोक्यात येणारे कृत्य करून स्वतः जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी जबाबदार धरून गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात स्फोटक पदार्थ अभिनियम 1884 कलम 5 (3)(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक अशोक भवड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news