Sangli News : जतमध्ये पाण्याच्या टाकीत पडून व्यापाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

जत येथील विजयपूर रोड परिसरातील घटना
Accidental Death
जतमध्ये पाण्याच्या टाकीत पडून व्यापाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू
Published on
Updated on

जत : जत येथील विजयपूर रोड परिसरातील व्यापाऱ्याच्या पत्नीचा घरासमोरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. सारिका अनिल पट्टणशेट्टी (वय ४४, रा. विजयपूर रोड, जत) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना गुरुवार, दि. २५ जून रोजी दुपारी घडली.

शहरातील किराणा व्यापारी अनिल पट्टणशेट्टी यांच्या पत्नी सारिका या गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घरासमोरील पाण्याच्या टाकीजवळ असताना त्यांचा पाय घसरला आणि त्या टाकीत पडल्या. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद यांनी या घटनेची माहिती जत पोलिसांना दिली. त्यानुसार जत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news