Sangli Crime : आरोपींच्या नातेवाईकांचा पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न

कवठेमहांकाळ येथील प्रकार; सातजणांविरोधात गुन्हा
Sangli Crime News
अटक
Published on
Updated on

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयितांना दुसऱ्या काही गुन्ह्यांच्या तपासकामी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देताना आरोपींच्या सात नातेवाईकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. १२) रोजी रात्री घडला असून शनिवारी (दि. १३) रोजी नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे शिपाई अभिजित कासार यांनी दिली.

केबलच्‍या चोरीप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी बुधवारी (दि. १०) जून रोजी राजकुमार शाम गोसावी, राहुल शाम गोसावी, प्रवीण तानाजी गोसावी आणि अरविंद तानाजी गोसावी (सर्व रा. ज्ञानगिरी वसाहत, सावळी (ता. मिरज) यांना अटक केली होती. दरम्यान, आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात सुध्दा या संशयितांचा सहभाग असल्याची बाब तपासात समोर आली. दोन्ही गुन्ह्यांतील संशयित एकच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पुढील तपासासाठी या चार संशयितांना आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी नेले जात होते.

संशयितांना घेऊन जात असतानाच त्यांचे नातेवाईक तानाजी आण्णाप्पा गोसावी, यशवंत मारुती गोसावी, सरस्वती प्रवीण गोसावी, ललिता शाम गोसावी, शाम नाना गोसावी, उमेशा आण्णाप्पा गोसावी, आणि हारुबाई गोसावी यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यासमोर पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्या सर्वच सात नातेवाईकांना पोलिसी खाक्या दाखवत ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news