Sangli Crime : प्यायला पाणी न दिल्यामुळे आई, मुलावर चाकूने हल्ला

विश्रामबाग येथील हनुमाननगर येथील घटना
Crime News
Crime NewsPudhari Photo
Published on
Updated on

​सांगली : विश्रामबाग येथील हनुमाननगर गल्ली नंबर ६ मध्ये गाडी धुण्यासाठी पाणी न दिल्याचा राग मनात धरून एका गुंडाने आपल्या दोन साथीदारांसह मिळून आई व मुलावर चाकूने हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. फिर्यादी स्वप्निल गौतम बनसोडे (वय ३५) यांच्या घरासमोर ही घटना घडली. याप्रकरणी सोहेल तांबोळी उर्फ ‘चंदा टोल्या’ व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल हे घरासमोरील कट्टा फोडण्याचे काम करत होते, तर त्यांची आई संगीता या घरासमोर वाळत घातलेले कपडे काढत होत्या. यावेळी संशयित सोहेल तांबोळी याने संगीता यांनी गाडी धुण्यास पाणी न दिल्याचा रागातून वादावादी करीत त्यांना शिवीगाळ केली. स्वप्निल यांनी त्यांना ‘तुम्ही गेटच्या आतमध्ये का आला?’ असे विचारले असता, सोहेल याने चाकू काढून स्वप्निल व त्यांची आई संगीता यांच्यावर वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला केल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news