Sangli Fraud Case : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने ३.५० लाखांचा गंडा

सांगली शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा
Fraud Case
Fraud Casefile photo
Published on
Updated on

​सांगली : ऊसतोड कामगार पुरवतो, असे सांगून ६ लाख ५० हजार रुपये घेतल्यानंतर, कामगार न पुरवता ३ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सांगोला (जि. सोलापूर) येथील एकावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील अशोक पाटील (वय ३६, रा. कवठेपिरान, ब्राह्मणगल्ली, ता. मिरज) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित सदाशिव हरिबा गडदे (वय ५०, व्यवसाय : ऊसतोड मजूर पुरवणे, रा. गडदे मळा, गौडवाडी, ता. सांगोला) याने २५ ऑगस्ट २०२२ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सांगलीवाडी येथे फिर्यादीकडून रोख व बँक खात्याद्वारे ६ लाख ५० हजार रुपये घेतले होते. मात्र, पैसे घेऊनही त्याने ऊसतोड कामगार पुरवले नाहीत.

फिर्यादीने वारंवार पैशांसाठी तगादा लावल्यानंतर संशयिताने त्यातील ३ लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित ३ लाख ५० हजार रुपये आजवर परत न करता आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news