Sangli Crime : 10 रुपये घेतले जादा, वृद्धाचा घेतला जीव !

कोळे हद्दीतील टेंभूच्या कालव्याशेजारील घटना
 Crime News
10 रुपये घेतले जादा, वृद्धाचा घेतला जीव !Pudhari Photo
Published on
Updated on

विजय लाळे

विटा : इतरांपेक्षा 10 रुपये पेट्रोलचे जादा का घेतले? याचा राग धरून वृद्धाचा त्याच्याच भावकीतल्या व्यक्तीने थेट डोक्यात कोयता घालून खून केला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना शनिवारी सकाळी कोळे (ता. सांगोला) हद्दीतील टेंभूच्या कालव्याशेजारी उघडकीस आली. बाबासाहेब भानुदास देशमुख (वय 76) असे मृताचे नाव आहे. त्याच्याच भावकीतील संजय देशमुख (वय 35) याने हे कृत्य केल्याचा आरोप आहे.

शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाणूरगड (ता. खानापूर) येथील बाबासाहेब देशमुख यांचा मृतदेह बाणूरगड ते कोळेदरम्यानच्या टेंभू योजनेच्या कालव्याजवळ सापडला. ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी सांगोला तालुक्यातील कोळे येथील बाजारात गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबातील लोक त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते फोन घेत नव्हते. सुरुवातीला अनोळखी मृतदेह अशी नेोंद होती, नंतर पोलिसांनी ओळख पटवली.

देशमुख हे सत्तरी ओलांडल्यानंतरही कष्टाने किराणा दुकान चालवत होते. 15 दिवसांपूर्वी झालेला एक छोटासा व्यवहार त्यांच्या जिवावर बेतेल, याची कल्पनाही कोणाला नव्हती. नातेवाईक असलेल्या संजयकडे पेट्रोलसाठी बाबासाहेबांनी 120 ऐवजी 130 रुपयांची मागणी केली. हाच 10 रुपयांचा वाढीव आकडा संजयच्या मनात सुडाची आग पेटवून गेला. तो राग शांत झाला नव्हता, उलट तो धगधगत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news