Sangli Crime : अवैध दारू अड्ड्यांवर जिल्हाभरात कारवाईचा बडगा

अवैध दारू अड्डे, मद्य विक्रीप्रकरणी 29 जणांना अटक ः प्रदीप पोटे
Illegal Liquor Raid
अवैध दारू अड्ड्यांवर जिल्हाभरात कारवाईचा बडगा
Published on
Updated on

सांगली : राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत गावठी दारू अड्डे, अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात मोहीम उघडून 41 गुन्हे दाखल केले. याप्रकरणी 29 जणांना अटक करण्यात आली. ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली कार्यालयामार्फत जिल्ह्यात शनिवारी, रविवारी या दोन दिवसाच्या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी अनेक गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या मोहिमेत सर्व निरीक्षक क्षेत्रांतर्गत 41 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 29 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान एक वाहन आणि इतर मुद्देमालासह 5 लाख 71 हजार 765 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये देशी मद्य 57.32 बल्क लिटर, हातभट्टी मद्य 1015 बल्क लिटर, विदेशी मद्य 3.72 बल्क लिटर, ताडी 250 बल्क लिटर इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. रसायन 10120 बल्क लिटर जागीच नष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news