‌Sangli Crime : ‘तू मागच्या जन्मीची नागीण आहेस‌’, असे म्हणून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

विट्यातील तीन भोंदू बुवांवर गुन्हा दाखल
Minor Girl Assault Case
‘तू मागच्या जन्मीची नागीण आहेस‌’, असे म्हणून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारFile Photo
Published on
Updated on

विटा : ‌‘तू मागच्या जन्मी नागीण होतीस, हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे,‌’ असे म्हणून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या येथील तीन भोंदूंविरोधात पोक्सोंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विट्यातील महेश मोहन बाबर (वय 38, रा. भवानी माळ, विटा), संकेत संदीप निकम (25, सध्या रा. विटा, मूळ रा. घोगाव, ता. पलूस) आणि सूरज उपाध्ये (25, रा. विटा) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, 1 जून 2024 ते 12 मे 2026 या काळात पीडित मुलीला शारीरिक आणि पित्ताशयाचा त्रास होता. ती आश्रमात आली होती. संशयित महेश आणि संकेत यांनी पीडितेला, ‌‘संकेत निकम हा शंकर बाबा, महाकाल, बाळुमामा आणि चिले महाराज यांचा अवतार आहे,‌’ असे भासवले. तसेच पीडितेच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार येतो, असे सांगून तिला पूजा आणि हवन करण्यास भाग पाडले.

संकेतने विटा येथील एका खोलीवर अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. शिवाय संशयित सूरजने पीडितेला ‌‘जर कोणाला काही सांगितलेस तर तुझे व्हिडीओ व्हायरल करेन,‌’ अशी धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news