Sangli Crime : सांगलीत उद्योजकाला तीस लाखांचा गंडा

व्यवस्थापकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
Sangli Fraud News
सांगलीत उद्योजकाला तीस लाखांचा गंडा file photo
Published on
Updated on

सांगली : येथील एका नामांकित व्यावसायिकाची कंपनीतीलच व्यवस्थापकाने तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सचिन शशिकांत मालू (रा. महात्मा गांधी रस्ता, जयसिंगपूर, ता. शिरोळ, सध्या रा. आनंद चिंतामणी सोसायटी, फ्लॅट क्र. ४०१, ओंकार बिल्डिंग, धामणी रस्ता, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. याप्रकरणी महंमद हसन रफिक पिरजादे (वय ३२, रा. न्यू रेल्वे पोलिस लाईन, स्टेशन रस्ता, मिरज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समृद्धी बिल्डिंग सिस्टीम कंपनीत फिर्यादी सचिन मालू हे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दि. १६ जून रोजी सकाळी १० च्या सुमारास संशयित महंमद पिरजादे यांच्याकडे कंपनीच्या व्यवहाराचे ३० लाख रुपये बॅँकेत भरण्यासाठी दिले होते; मात्र पिरजादे यांनी या रकमेचा बँकेत भरणा करण्याऐवजी परस्पर ती रक्कम स्वत:च्या आर्थिक लाभासाठी वापरली. हा प्रकार निदर्शनास येताच सचिन मालू यांनी संशयित महंमद पिरजादे याच्यावर गुन्हा दाखल केला.

मालू यांच्या कंपनीत पिरजादे हा गेल्या सहा वर्षांपासून नोकरीस होता. प्रामाणिकपणे काम करून त्यांनी विश्वास संपादन केला होता. त्यामुळेच त्याच्याकडे तीस लाख रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी देण्यात आली होती; मात्र ती बँकेत न भरता पैशासह तो पसार झाला. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news