Sangli Crime : धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तासगाव तालुक्यातील प्रकार; जरंडी येथील तरुणावर गुन्हा दाखल
assault case
assault casepudhari photo
Published on: 
Updated on: 

तासगाव : तासगाव तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी तसेच मोबाईलमध्ये फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याप्रकरणी रोहित शंकर पाटील (वय २३, रा. जरंडी, ता. तासगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, संशयित रोहित पाटील याच्याशी पीडित मुलीची पूर्वीपासून ओळख होती. एप्रिल २०२६ मध्ये पीडित मुलगी घरात एकटी असताना रोहित तिच्या घरी आला. त्यावेळी त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच स्वतःच्या मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले.

त्यानंतर ऑगस्ट २०२६ मध्ये संशयित रोहित पाटील याने पुन्हा पीडितेशी संपर्क साधला. मोबाईलमधील फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने तिला एका लॉजवर नेले आणि तेथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. या लागोपाठ घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने अखेर आईला सर्व हकीकत सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित मुलगी व तिच्या आईने तासगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news