Sangli Crime: निखिल कलगुटगी खुनातील मुख्य सूत्रधारांसह चौघांना अटक

सलीम पठाण, चेतन कलगुटगीला लोणावळ्यात बेड्या : खून प्रकरणात आतापर्यंत 13 जण अटकेत : मिरज शहर गुन्हे प्रकटीकरणची कारवाई
Sangli Crime: निखिल कलगुटगी खुनातील मुख्य सूत्रधारांसह चौघांना अटक
Pudhari Photo
Published on
Updated on

मिरज : मिरजेत निखिल कलगुटगी याच्या खुनातील मुख्य सूत्रधारांसह चौघांना पोलिसांनी पुण्यातील लोणावळ्यामध्ये बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सलीम गौस पठाण (वय 37, रा. मंगळवार पेठ, मिरज), चेतन सुरेश कलगुटगी (28, रा. वडर गल्ली, मिरज), सोहेल जमीर तांबोळी (26, नगारजी गल्ली, खणभाग रा. सांगली) आणि विशाल बाजीराव शिरोळे (24, रा. होळी कट्टा मंगळवार पेठ, मिरज) यांचा समावेश आहे.

याप्रकरणी प्रथमेश सुरेश ढेरे (25), सर्फराज बाळासाहेब सय्यद (22), सूरज चंदू कोरे (26, तिघेही रा. ढेरे गल्ली, मिरज), प्रतीक सचिन चव्हाण (20, रा. दिंडीवेस, मिरज), करण लक्ष्मण बुधनाळे (21, रा. दुर्गानगर, मिरज), गणेश ऊर्फ निहाल तानाजी कलगुटगी (27, रा. वडर गल्ली, मिरज), संग्राम राजेश यादव (26, रा. शिवनेरी चौक, मिरज) यांच्यासह दोन अल्पवयीन गुन्हेगारांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

मिरजेतील गणेश तलाव येथे दि. 28 सप्टेंबररोजी धारदार हत्यारांनी हल्ला करून निखिल कलगुटगी याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्यानंतर मिरज शहर पोलिसांनी दोन अल्पवयीन गुन्हेगारांसह 9 जणांना अटक केली होती.

परंतु या खुनातील मुख्य सूत्रधार सलीम पठाण, चेतन कलगुटगीसह विशाल शिरोळे हा फरार होता. त्यांच्या मागावर मिरज शहर गुन्हे प्रकटीकरणचे पथक होते. खुनाला दीड महिना लोटला तरी दोघे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, निरीक्षक किरण चौगले यांनी गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांचे पथक तपास करीत होते. अखेर त्यांच्या पथकाला मुख्य सूत्रधार पुण्यातील लोणावळा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यावेळी अन्य दोघेही त्या ठिकाणी सापडले. या दोघा मुख्य सूत्रधारांसह चौघांना पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली.

दरम्यान, चार ते पाच महिन्यांपूर्वी निखिल कलगुटगी याचा मामा रोहन कलगुटगी याच्यावर संशयितांनी गोळीबार गेला होता. परंतु त्यातून तो बचावला होता. त्यावेळी निखिल याने रोहन याला पोलिसात गुन्हा दाखल करण्यास मदत केली होती. याचा राग संशयितांच्या मनात होता. त्यामुळे संशयितांनी निखिल याचा खून करून त्याचा काटा काढला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे.

खुनास पक्षप्रवेशाची किनार

निखिल कलगुटगी याचा दि. 29 सप्टेंबररोजी एका पक्षात प्रवेश होणार होता. परंतु त्याच्या पक्षप्रवेशाला सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांचा विरोध होता. त्यातूनच त्या दोघांनी अन्य साथीदारांच्या मदतीने त्याचा खून केला. निखिल याचा होणारा पक्षप्रवेश खटकल्यानेच त्याचा खून केल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news