Sangli Job Fraud : पोलिस, टपाल खात्यात नोकरीच्या आमिषाने दोघांना 9 लाखांचा गंडा

सांगलीतील एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Sangli Job Fraud
पोलिस, टपाल खात्यात नोकरीच्या आमिषाने दोघांना 9 लाखांचा गंडाPudhari File Photo
Published on
Updated on

सांगली : पोलिस आणि टपाल खात्यामध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने सांगलीतील दोघांना 9 लाख 8 हजार 75 रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी श्रीकांत कोंडिबा पवार (वय 50, रा. वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांनी सुनील मधुकर पाटील (वय 53, रा. वसंतनगर, सांगली) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संशयित सुनील पाटील हा सिक्युरिटी गार्डचे काम करतो. त्याने श्रीकांत पवार व त्यांचा मित्र राजकुमार गणपती खोत (वय 41, रा. खणभाग, सांगली) या दोघांची फसवणूक केली आहे. सुनील पाटील याने श्रीकांत पवार यांना टपाल खात्यामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्याने त्यांच्याकडून 4 लाख 21 हजार 685 रुपये घेतले. तसेच त्यांचा मित्र राजकुमार खोत यांना पोलिस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 4 लाख 86 हजार 390 रुपये घेतले होते. परंतु सुनील पाटील याने दोघांनाही पोलिस आणि टपाल खात्यात नोकरी लावली नाही. दोघांनी याबाबत त्याच्याकडे वारंवार विचारणा केली. मात्र त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.

श्रीकांत आणि राजकुमार यांनी सुनील पाटील याच्याकडे दिलेली रक्कम परत देण्याची मागणी केली. परंतु त्याने ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. यानुसार श्रीकांत यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. याबाबत सांगली शहर पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news