Sangli Crime : पलूसमध्ये घरफोडी; १ लाख ८१ हजारांचा ऐवज लंपास

सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम पळवली
House robbery
House robberyfile photo
Published on
Updated on

पलूस : येथील निसर्ग सिटी परिसरातील विश्वनाथ मल्टिपर्पज हॉलसमोर असलेल्या घराचे कुलूप व कोयंडा तोडून बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमधील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सर्जेराव विलास कोळी (वय ४५, व्यवसाय एसटी वाहक, रा. कुंडल, ता. पलूस) यांच्या घरात २२ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजल्यापासून२३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान ही चोरी झाली. चोरट्याने घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप व कोयंडा कशाच्या तरी साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर ड्रॉवरमधील लॉकरमध्ये ठेवलेला सोन्याचा नेकलेस, सोन्याचे कानातील टॉप्स व वेल, सोन्याच्या कानातील रिंगा, चांदीचा करंडा तसेच रोख रक्कम चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजात १ लाख १४ हजार रुपये किमतीचा तीन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, ३५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम १३४० मिली. वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स व वेल, १० हजार रुपये किमतीच्या तीन ग्रॅम २५० मिली. वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंगा, दोन हजार रुपये किमतीचा चांदीचा करंडा आणि २० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news