Sangli Crime : स्वस्तात गहू देतो म्हणून 35 हजारांची फसवणूक

आईच्या आजारपणाचे नाटक; तिघांविरोधात गुन्हा
fraud News
स्वस्तात गहू देतो म्हणून 35 हजारांची फसवणूकfile photo
Published on
Updated on

सांगली ः आई हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचे खोटे कारण सांगून वेळोवेळी पैसे घेऊन त्याबदल्यात सवलतीच्या दरात उच्च प्रतीचा गहू देण्याचे आमिष दाखवून एकास 35 हजार रुपयांना गंडा घातला. संजयनगर पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे.

दौलतराव शंकरराव घोरपडे (रा. कलानगर) यांनी फिर्याद दिली आहे. संगाप्पा दोडमणी, विकास दोडमणी आणि रचप्पा मदार (सर्व रा. उमराणी, ता. जत) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. संशयितांनी संगनमत करून फिर्यादी घोरपडे यांचा विश्वास संपादन केला. त्यांनी घोरपडे यांच्याकडून वेळोवेळी एकूण 35 हजार रुपये उसने घेतले. या रकमेच्या मोबदल्यात 380 किलो उच्च प्रतीचा गहू देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. घोरपडे यांची खात्री पटवण्यासाठी त्यांना एक किलो गव्हाचा नमुनाही दिला होता. पैसे दिल्यानंतर काही दिवसांनी घोरपडे यांनी गव्हाची मागणी करण्यासाठी संशयितांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर 15 हजार रुपये परत केले, मात्र उर्वरित पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news