Sangli Crime : शेतीच्या वादातून सावत्र भावाकडून कुऱ्हाडीने हल्ला

सिद्धनाथ येथील घटना ः आई-मुलगा गंभीर जखमी
Crime  News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

जत : तालुक्यातील सिद्धनाथ येथे जुन्या शेतजमिनीच्या वादातून सावत्र भावाने कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात यलगोंड बसाप्पा माळी व त्यांची आई विमला माळी हे गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी यलगोंड बसाप्पा माळी (वय 30, रा. सिद्धनाथ, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागराज बसाप्पा माळी याच्याविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दि. 17 मेरोजी शेतजमिनीच्या जुन्या कारणातून नागराज व यलगोंडा यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर पहाटे यलगोंड माळी, त्यांचे भाऊ राकेश व गिरीष हे घरासमोरील अंगणात झोपले असताना संशयित नागराज हा कुऱ्हाड घेऊन तेथे आला. ‌‘तुम्हाला आता जिवंत ठेवत नाही,‌’ अशी धमकी देत त्याने यलगोंड यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले.

यलगोंड यांनी आरडाओरडा करताच त्यांची आई विमला या भांडण सोडवण्यासाठी धावल्या. संशयिताने त्यांच्याही हातावर कुऱ्हाडीने वार केला. तसेच दगडाने मारहाण करून त्यांनाही जखमी केले. दरम्यान, फिर्यादीचे भाऊ राकेश व गिरीष हे मदतीस आले असता त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी यलगोंड व विमला यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपास पोलिस उपनिरीक्षक विश्वंभर पोटे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news