Sangli Crime: ‘तुमची मेलेली मुलगी भूत होऊन झपाटते‌’ म्हणत कुटुंबावर हल्ला

जाडरबोबलाद येथील घटना; तिघांवर गुन्हा दाखल
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

जत शहर/वळसंग : तुमची मेलेली मुलगी भूत होऊन झपाटते, असे म्हणत एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. जाडरबोबलाद (ता. जत) येथे ही घटना घडली. यामध्ये महानंदा ईश्वराप्पा ऐनापुरे (वय 40, रा. जाडरबोबलाद), पती ईश्वराप्पा ऐनापुरे व मुलगा अनिल ऐनापुरे हे जखमी झाले. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शिवानंद दुंडाप्पा माडग्याळ, प्रवीण शिवानंद माडग्याळ व प्रशांत शिवानंद माडग्याळ (सर्व रा. जाडरबोबलाद, ता. जत) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.दि. 12 एप्रिल 2026 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महानंदा यांच्या नवीन घरासमोर ही हल्ल्याची घटना घडली. तिघे संशयित दुचाकीवरून येऊन महानंदा यांना शिवीगाळ करू लागले. यावेळी ‌‘चार वर्षांपूर्वी मृत झालेली तुमची मुलगी ही भूत बनून आमच्या कुटुंबातील महिलेला झपाटते‌’, असा आरोप करत त्यांनी वाद घातला.

वाद वाढल्याने आरोपींनी महानंदा यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मध्ये पडलेल्या फिर्यादीच्या पतीच्या डोक्यावर शिवानंद याने काठीने प्रहार करून त्यांना जखमी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news