Sangli Crime: पोलिस, वाहकावर हल्ला; दोघांना अटक

संशयित सराईत : चालक-वाहकांना वाचविल्याने महामंडळाकरून पोलिसांचे आभार
Sangli Crime
मिरज : जखमी पोलिस कर्मचारी कोंडीबा सरगर यांची एस.टी. महामंडळाच्या अधिकार्‍यांनी भेट घेऊन आभार मानले.
Published on
Updated on

मिरज : येथे एसटी चालक आणि वाहकाला वाचवताना नशेखोराच्या चाकू हल्ल्यात कोंडीबा सुबराव सरगर हे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार अब्दुलरहेमान अख्तर पटेल आणि त्याचा भाऊ सैफुल्ला अख्तर पटेल (दोघे रा. उस्मानिया मोहल्ला, मिरज) या दोघांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे.

मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर-जालना बसचे चालक परमेश्वर सुखदेव लामकाने हे बस घेऊन जालन्याकडे निघाले होते. या वेळी नशेत असलेल्या दोन भावांनी बस अडवून चालक परमेश्वर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाहकाने मध्यस्थी केली असता हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला चढवला.

दरम्यान, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी कोंडीबा सरगर व धनंजय घुबडे हे गस्त घालत असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी धाडसाने संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, अब्दुलरहेमान पटेल याने सरगर यांच्यावर चाकूने वार केले. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेे. आपला जीव धोक्यात घालून एसटी चालक व वाहकाचे प्राण वाचवल्याबद्दल एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन सरगर यांची भेट घेतली व त्यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news