Sangli Crime : आटपाडीत वाहन शोरूम चालकाला 14 लाखांना लुटले

चाकूचा धाक दाखवत तिघा दुचाकीस्वारांचा हल्ला
Crime News
Sangli Crime News File Photo
Published on
Updated on

आटपाडी ः आटपाडी शहरात दिवसा तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी वाहन शोरूम चालकाकडील तब्बल 14 लाखांची रोकड लंपास केली आहे. ही घटना 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.55 वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी होंडा शोरूमसमोर घडली. याबाबत शोरूम चालक सुनील मोहन हाके (वय 51, रा. हाकेमळा, आटपाडी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटपाडी ग्रामीण रुग्णालयासमोर हाके यांचे दुचाकी मोटरसायकल शोरूम आहे. 15 एप्रिल रोजी रात्री हाके शोरूम बंद करून दुचाकीवरून घरी निघाले होते. होंडा शोरूमसमोर पोहोचताच समोरून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी एकाने हाके यांच्या पाठीवरील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाके यांनी प्रतिकार केल्याने दुसऱ्या इसमाने चाकूसारखे धारदार हत्यार (एडका) दाखवून त्यांना धमकावले. जिवाच्या भीतीने हाके यांनी बॅग सोडून दिली. आरोपींनी बॅगेमधील 14 लाखांची रोख रक्कम घेऊन दुचाकीवरून पळ काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news