Krishna Sagare : भारतीय क्रिकेट संघ कृष्णाच्या टप्प्यात

15 वर्षांखालील राष्ट्रीय कॅम्पसाठी झाली निवड
Krishna Sagare
Krishna Sagare
Published on
Updated on

सांगली : महिला क्रिकेटमध्ये सांगलीच्या कृष्णा सगरेने देदीप्यमान कामगिरीची नोंद केली आहे. पंधरा वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय कॅम्पमध्ये तिची निवड झाली असून भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रवेशद्वार मराठमोळ्या कृष्णासाठी अवघ्या काही पावलांच्या अंतरावर उरले आहे. सांगलीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

कृष्णाचे वडील मिथुन सगरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मी आणि माझा मित्र विज्ञान माने रोज सकाळी तिचा सराव घेत होतो. त्यानंतर चेतन पडियार, विजय वावरे, सागर पेंडळकर, सागर कोरे, दुबळ यांनी तिला मार्गदर्शन केले. सहा वर्षांत तिनं घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

भारतीय संघाचे माजी खेळाडू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली 17 मेपासून तिचा कॅम्प बंगळुरू येथे सुरू होतो आहे. मुंबईचे कोच विनायक माने, प्रशांत शेट्टी, सामंत आणि तिचे एसएनसी कोच ध्रुव वेदक, संजय बजाज, नीलेश शाह आणि राहुल आरवाडे यांच्या सहकार्याने तिला योग्य संधी मिळाल्याचे सगरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news