Sangli Fraud Case: पतसंस्थेत खोट्या सह्या करून सव्वाकोटीचा अपहार

महिलेची भावासह शाखाधिकाऱ्याविरोधात विश्रामबाग पोलिसांत तक्रार
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

​सांगली : मार्केट यार्ड परिसरातील 'दि सांगली ट्रेडर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटी'मध्ये मुदत ठेवी आणि बँक खात्यांवर बनावट सह्या करून १ कोटी २५ लाख ८१ हजार ९८४ रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोल्हापूर येथील महिला व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून त्यांच्या भावासह पतसंस्थेच्या शाखाधिकाऱ्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर येथील व्यावसायिक दीपाली अनिल टिक्के (वय ४८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून त्यांचे भाऊ गौतम महावीर पत्रावळे (वय ४७, रा. एकता कॉलनी, सांगली) आणि 'दि सांगली ट्रेडर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटी'चे शाखाधिकारी पायगोंडा नरसगोंडा पाटील (वय ५५, रा. समडोळी, ता. मिरज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २०२१ ते ८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ही फसवणूक झाली. संशयित गौतम पत्रावळे याने शाखाधिकारी पायगोंडा पाटील यांच्याशी संगनमत करून दीपाली टिक्के यांच्या संमतीशिवाय बँक ट्रान्स्फर पावतीद्वारे एफडीचे १६ लाख ७७ हजार ७४९ रुपये, २३ लाख १ हजार ७०५ रुपये, २० लाख ३२ हजार १५१ रुपये आणि ५४ लाख १ हजार ३७९ रुपये राजारामबापू सहकारी बँकेच्या संयुक्त खात्यावर वर्ग केले. त्यानंतर संशयित पत्रावळे याने टिक्के यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या ठेव पावत्यांवरील व बँक खात्यांवरील एकूण १ कोटी २५ लाख ८१ हजार ९८४ रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. विश्रामबाग पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news