Sangli Crime : दुचाकी अडवून चुलत भावांवर चाकूने हल्ला

मतकुणकी येथील घटना
Crime News
Crime NewsPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

तासगाव : एकमेकांकडे वाकड्या नजरेने पाहिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी दुचाकी अडवून दोघा चुलत भावांवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. रविवारी रात्री साडेआठ वाजता मतकुणकी ते उपळावी रस्त्यावर तलावाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात अतुल शहाजी शिरतोडे आणि अजिंक्य बाळासाहेब शिरतोडे (दोघे रा. उपळावी, ता. तासगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सत्यम पाटील, विश्वजित रनवरे आणि विक्रम पाटील (पूर्ण नाव माहीत नाही, तिघे रा. मतकुणकी) या तिघांविरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल शिरतोडे हे आपल्या चुलत भावासोबत दुचाकीवरून मतकुणकी गावातील चिंचणी फाट्यावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना मतकुणकी ते उपळावी रस्त्यावरील तलावाजवळ वरील तिन्ही संशयितांनी त्यांची दुचाकी अडवून थांबवली. ‘तुम्ही आमच्याकडे वाकडे का पाहिले?’ अशी विचारणा करत त्यांनी दोघांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी संशयितांपैकी एकाने अचानक चाकू काढून अतुल यांच्या डाव्या डोळ्याखाली आणि डोक्याच्या डाव्या बाजूला कानाच्या वर वार केले. तसेच अजिंक्य यांच्या पाठीवर दोन्ही बाजूंना आणि डोक्याच्या डाव्या बाजूला कानाच्या वर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी तासगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news