‌Sangli News : ‘गरीबों की सारी कमाई... खा गयी महंगाई‌’

सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर; जिल्हास्तरावर आंदोलन छेडणार
‌Sangli News
सांगली : येथे महागाईविरुध्द आंदोलन करताना राजेश नाईक व काँग्रेसचे कार्यकर्ते. (छाया : सचिन सुतार)
Published on
Updated on

सांगली : गरीबों की सारी कमाई... खा गयी महंगाई, चले जाव... चले जाव... भाजप सरकार चले जाव, गली गली में शोर है, महंगाई का जोर है... अशा घोषणांनी स्टेशन रोडवरील पेट्रोल पंप परिसर दणाणून गेला. महागाईविरोधात काल सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने भाजपा सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी, आजचे मोदी सरकार महागाई रोखण्यामध्ये अपयशी ठरले असल्याचे सांगून, सर्वसामान्य जनतेला महागाईमुळे जगणे कठीण झाल्याची भावना व्यक्त केली. पंतप्रधानांनी कसरतीच्या केलेल्या सूचना पाच राज्यांच्या निवडणुकीच्या अगोदर का केल्या नाहीत? सामान्य जनतेला उपदेश देत, ते स्वतः मात्र परदेश दौरे का करीत आहेत? याविरुध्द लवकरच जिल्हास्तरावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

डॉ. सिकंदर जमादार यांनी, जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे खत देण्यातही सरकार अपयशी ठरल्याची टीका करून, शेतकरी, कामगार, विद्यार्थ्यांच्या विरोधी असलेल्या या सरकारविरुध्द एकत्रित लढा देऊ, असा इशारा दिला. सुभाष खोत, नगरसेवक सागर बिरनाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी आंदोलनात डी. पी. बनसोडे, अजित ढोले, नगरसेवक मयूर पाटील, प्रमोद सूर्यवंशी, अंजली जाधव, अरुण पळसुले, दिलीप पाटील, विक्रम सावर्डेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news