सांगली : फेक व्हिडीओप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार

गुन्हा दाखल ः संबंधितावर कारवाईची मागणी
sangli Crime News
फेक व्हिडीओप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली. File Photo
Published on: 
Updated on: 

सांगली ः सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा 2019 चा राजकीय पक्षाला पाठिंबा दिल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यात आला. याप्रकरणी पाटील यांचे निवडणूक प्रतिनिधी गजानन साळुंखे यांनी सांगली शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

सांगलीत भाजप, काँग्रेस व अपक्ष अशी तिरंगी लढत झाली. मतदानाच्या आदल्या रात्री अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत होता. या व्हिडीओत त्या एका राजकीय पक्षाला पाठिंबा देत असल्याचे सांगताना दिसतात. पण हा व्हिडीओ 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी होता. यावर पाटील यांनी तातडीने व्हिडीओद्वारे उत्तर देत हा प्रकार निंदनीय असून, फेक व्हिडीओ असल्याचे म्हटले. त्यांचे निवडणूक प्रतिनिधी गजानन साळुंखे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. सायंकाळी शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news