

सांगली : जिल्ह्यात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अनावश्यक साठेबाजी न करता, आवश्यक तेवढ्याच प्रमाणात इंधन खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
ते म्हणाले, एचपीसीएल कंपनीचे पेट्रोल 450 किलो लिटर व डिझेल 550 किलो लिटर, बीपीसीएल कंपनीचे पेट्रोल 520 किलोलिटर व डिझेल 650 किलोलिटर आणि आयओसीएल कंपनीचे पेट्रोल 1490 किलो लिटर व डिझेल 1420 किलोलिटर साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी जिल्हा स्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरू आहेत. सध्या जिल्ह्यात एलपीजीचा एचपीसीएल कंपनीचा 2749 टन व सुमारे 2037 टन साठा मार्गावर, बीपीसीएल कंपनीचा 75.1 टन व सुमारे 116.4 टन साठा मार्गावर आहे, तसेच आयओसीएल कंपनीचा 43 टन साठा उपलब्ध आहे.