CNG gas leak : कंटेनरमधून सीएनजी गॅस गळती

वाळवा फाट्याजवळील घटनेने थरकाप
CNG gas leak : कंटेनरमधून सीएनजी गॅस गळती
Published on
Updated on

ईश्वरपूर : पेठ - सांगली मार्गावर येथील वाळवा फाट्याजवळ सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधील गॅसची एक टाकी लिकेज झाली. गॅस गळतीमुळे या मार्गावर काही काळ एकच खळबळ उडून वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वाघवाडी येथील सीएनजी प्लांटवरून सीएनजी गॅस भरून कंटेनर सांगलीच्या दिशेने चालला होता. शहरातील आंबेडकर नाका परिसरात हा कंटेनर आला असता कंटेनरमधील सीएनजीच्या एका टाकीतून अचानक गॅस गळती सुरू झाली. कंटेनर चालकाने शहराबाहेर हा कंटेनर नेऊन उभा केला. घटनेचे गांभीर्य ओळखून त्या परिसरातील काही व्यावसायिकांनी रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. बराच वेळ या गॅसचा आवाज सुरू होता. पालिकेचे अग्निशमनचे वाहन घटनास्थळी येईपर्यंत या टाकीतील गॅस संपला होता. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news