False HIV report: एचआयव्ही नसताना अहवाल आला पॉझिटिव्ह

सांगलीतील एका क्लिनीकच्या खासगी लॅबमधील प्रकार; डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यास नकार
HIV test
HIV testPudhari
Published on
Updated on

सांगली : येथील एका आय क्लिनीकमध्ये चालवण्यात येणाऱ्या लॅबोरेटरीमधून एका व्यक्तिस एचआयव्ही नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित क्लिनीकवर व लॅब चालकावर कारवाई करावी, अशी तक्रार जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्याकडे झालेली आहे. यासंदर्भात चौकशी करून 23 एप्रिलरोजी होणाऱ्या बोगस शोध मोहीम समितीच्या बैठकीत कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हधिकारी यांनी दिले.

जिल्ह्यातील एका गावातील वृद्धेची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगलीतील श्री टेके आय क्लिनीक येथे तपासणीसाठी आल्या. क्लिनीकमधील लॅबमध्ये 16 फेब्रुवारीला एचआयव्ही व हिपॅटिटेस बीची तपासणी करण्यासाठी सांगण्यात आले. परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनी एचआयव्हीची तपासणी 28 जानेवारी 2026 रोजीच केल्याचे सांगून व हा त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांना सांगितले.

परंतु डॉक्टरांनी पुन्हा एचआयव्हीची तपासणी करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार क्लिनीकच्या लॅबमध्ये एचआयव्हीची तपासणी केली. त्याचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तुमची शस्त्रक्रिया करता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी शासकिय यंत्रणेमार्फत 19 फेब्रुवारीला पुन्हा तपासणी केली. त्याठिकाणही एचआयव्ही निगेटिव्ह अहवाल आला.

क्लिनीकतर्फे करण्यात आलेल्या तपासणीमध्ये जो अहवाल देण्यात आला, त्या अहवालवर नोंदणीकृत डॉक्टरांची सही नसल्याचे आढळून आले. या सर्व गोष्टी उघडकीस आल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी टेके आय क्लिनीकविरोधात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडेही तक्रार करण्यात आली आहे.

नागपूर उच्च न्यायालयाने चुकीचा अहवाल देणाऱ्या डीएमएलटी टेक्निशिअला महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशिनर्स कायद्याखाली (बोगस डॉक्टर) नुसार शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे टेके आय क्लिनीकमध्ये अशाच प्रकारे कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावे, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news